STORYMIRROR

Somesh Kulkarni

Tragedy Crime

3  

Somesh Kulkarni

Tragedy Crime

भेसळ

भेसळ

1 min
11.7K

दररोज जायची ती दुकानात करायला मदत आईला

माहित नव्हतं तिला काय कारण होतं आईच्या घाईला


दररोज लवकर घालवून द्यायची तिला घरी

नुसती दुकानातच बसशील थोडा अभ्यास कर तरी


आज सकाळीच शाळेत जाताजाता तिला दिसली दुकानासमोर गर्दी

आईला घातल्या होत्या बेड्या त्या माणसांनी ज्यांची होती खाकी वर्दी


शेजारची कुसुममावशी रडताना सांगत होती आईचं नाव

पिठात केली होती भेसळ किती वाईट असते हाव?


स्वयंपाक करुन खाल्ल्यावर सुमी चक्कर येऊन पडली

दवाखान्यात विषबाधेचं नाव ऐकल्यावर आई धायमोकलून रडली


आता कळलं ती गेल्यावर दुकानात यायची लोकं अन्नात भेसळ करायची

आईलाही मिळायचे पैसे तिला माहित नव्हतं किती लोकं भेसळीने मरायची


गेला होता तिच्यासमोर भेसळीचा एक बळी

आगीचे दाह जाणवणारी ती होती एकटीच कळी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy