निष्पाप बळी
निष्पाप बळी

1 min

11.3K
बाळा माफ कर ना मला
झाला हातून माझ्या गुन्हा
भुकेल्या पोटी असह्य वेदना
म्हणुनी खाल्ले अननस मी ना
नाही वाचवू शकले तुला रे
झाला हातून गुन्हा
बाळा माफ कर ना मला||
माणुसकीचे खातिर मी रे
ठेवला माणसावर विश्वास
माहित नव्हते मला ते बाळा
त्याने केला असा हा घात
बाळा माफ कर ना मला||
ज्वाळ उठला तोंडात माझ्या
मी काय कुणाला सांगू
शांत होण्या मार्ग निवडला
नदीत शांत होण्या जणू
बाळा माफ कर ना मला||
निष्पाप होता तू बाळा
नाही तुझा रे गुन्हा
मला संपविता तुलाही संपविले
घडला माणसाचे हातून गुन्हा
बाळा माफ कर ना त्याला||
चिरनिद्रेत बाळा आता विसावा
जन्म पुन्हा रे कधी मिळावा
घातले साकडे देवा पुन्हा
माझ्याच पोटी तू जन्म घ्यावा पुन्हा
झाला हातून माझ्या गुन्हा
बाळा माफ करना मला||