STORYMIRROR

Dilip Kale

Tragedy Inspirational Others

3  

Dilip Kale

Tragedy Inspirational Others

वचन बैलाचं

वचन बैलाचं

1 min
11.9K


काम करता करता 

साऱ्या हड्डया चुरा झाल्या

बसता नाय येत धड

त्या आवाज करू लागल्या


जवान होतो तवा

म्या नांगर जोमाने ओढला

मले थकवा नव्हता येत

कारण? त्या अलप गव्हाणीत मांडला


नांगर वखरण करून

म्या सफा ठेवली जमीन

भुसभुशीत करून दिली

कशी पेरायला तुई जमीन


मया भरोश्यावर तुया

जमीनी इकत घेतल्या

बांधले घर माळ्या तुया

पोरी तुया नवऱ्या सजविल्या


जवान असताना रगत

मया अंगात होतं

लागत नोती आरू मले

आज बोलणंही खुपत होतं


तरी आशीर्वाद देतो तुले

तूय असंच भलं होवो

दुसऱ्याही जलमी म्या

तुयाच घरी येवो


विनवणी तुला शेवटची

मया येळ भरत आला

तू रडू नको आता

पुन्हा येईल तुयाच गव्हाणीला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy