मातीत राबणारी माणसं...
मातीत राबणारी माणसं...
मातीत राबणारी माणसं आम्ही, केलं देवानं गोंधन
गोंधन करून पाठवलं देवानं, म्हणे कर शेतीचं निंधन
पाणी आलं रं-आलं रं-समद्या उभ्या पिकावर
पिक डूलते कसं वं- जसा नाचतो रं मोर
पाहा पिकाचा डोलारा-जसा तुरा रे मोराचा
पाहती झाडाहून पाखरं-तुरा रं पिकाचा
त्यांना भक्ष्य हवं आहे-ते शोधती रं पान
अळी पानावर दिसेना-होईन कसा पाहुणचार
कळप हरणांचे येती-उभ्या पिकावर
शेतकरी हाकतो रे त्यांना-तरी येती पिकावर
का? समद्यांची चाकरी-आहे बळीराजावरी
पाणी काकराणं जाते-काटा रुततो रं खुरी
हिरवं सपन फुललं-हसू कधी याचे गालावर
कधी कमी पाण्यानं वं जाते-कधी पाणी आल्यावर
हसू चार दिसाचं-दिसते बळीराजाचे हो होटी
कधी ओला मारतो रे-कधी सुका याचे माथी
काय? हसावं की रडावं-डोई कर्जाचा डोंगर
माथा उजलीन कवा-कधी फुटीन पाझर
मातीत राबणारी माणसं आम्ही-काय हाल करतो आहे
येगा देवा तू भेटीला-बळीराजा वाट तुझी बघतो आहे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
शब्दाचा अर्थ
(गोंधन- अंगावरील देवाघरचा शिक्का)
