रूपाचे कफन
रूपाचे कफन
1 min
326
नाही कळले
कधी तिचे मन
न्याहाळले तन
प्रत्येकाने
सौंदर्याच्या जगी
रूपाची ती राणी
सुरू कहाणी
अंधारात
रूपाने सोज्ज्वळ
मन निर्मळ असे
कस्तुरी जसे
सुगंधित
परिस्थिती घरची
असे खूप गंभीर
होती खंबीर
ती
कमवण्या पैसा
केला रूपाचा लिलाव
मिळाला भाव
रुपाला
सांभाळले घर
जरी झाली बदनाम
केले काम
कर्तव्यापोटी
मनाचे सौंदर्य
झाले मनात दफन
रूपाचे कफन
सोबतीला
