STORYMIRROR

Pradeep Sahare

Comedy Fantasy

3  

Pradeep Sahare

Comedy Fantasy

जादू

जादू

1 min
177

आयुष्य आहे भाऊ,

एक जादूचा खेळ .

आयुष्य आहे एक रोमांच.

आयुष्यात येते,

एक भोळी नारी अणं,

'धङधाकट मानसाला ,

 लावते मग वेड़ .

एकदा लागल वेड़

नाही राहत मग,

वेळेच त्याला भान,

दिवस आणी रात्र,

दोन्ही वाटते समान .

एक एक भेटी साठी,

जीवाचा आटापीटा.

एक सारख्या घरासमोर,

दिवस रात्री खेटा .

संपल्या एकदाच्या खेटा,

मग होते सुरु रोमांचित खेळ.

जी वेळ,

लावत होती वेड .

ती वेळ आता

खायला धावते .

बंधनाच कोयत,

माग माग धावते .

इथ नको जाऊ,

तीथ नको जाऊ .

इकडे नको पाहू,

तीकडे नको पाहू.

रात्र अणं दिवस,

घाबरुन राहते भाऊ.

आवडी निवडी,

गुंडाळून ठेवते भाऊ.

भेंडीची भाजी,

पनीर सारखी वाटते .

खारट झाली तरी,

ताट घेऊन चाटते .

छोटया,मोठया गोष्टीचा,

होते मोठा बाऊ .

मुंग गीळून बसते,

दयता सारखा भाऊ.

अस नाही भाऊ,

तीला नाही कळत,

सगळ तीला कळते .

कळल की मगं,

वड्याच तेल,

वांग्यावर काढते .

एवढया मोठया,

ढाण्या वाघावर,

होते जबान सैल.

कधी वाटते चक्रम,

अन...

कधी वाटते बैल .

हीच आहे भाऊ,

खरी मोठी जादू.

म्हणून सांगतो एकदा,

रोमांचीत आहे,

जीवन मोठ भाऊ.

बाऊ केला तर,

खायला धावते.

गाऊ केला की मग,

मधूर संगीत वाहते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy