ती तशी
ती तशी
देवाची सुंदर नक्काशी,
मोहल्यातली काशी.
सावळी, सलोनी,
कमल नयनी.
चेहऱ्यावर नेहमी हँसी.
सगळ्यांनाच वाटे,
बोलाव थोड तीच्याशी,
ती नव्हती बोलत कुनाशी.
एक दिवस कळले नाही,
कधी,कुनास केव्हा,
कधी झाली ती नाहीशी.
या गेली कुठे परदेशी ?
पण गावात चर्चा मात्र,
जोरात सुरु झाली,
ती होती तशी...
ती होती तशी...