भक्तवत्सल
भक्तवत्सल


काव्यप्रकार अभंग
रचना ६/६/६/४
पंढरीची वारी/ वारकरी घरी/
भावभोळा हरी/ भक्तांघरी//(१)
कर कटेवरी/ दिसती तयाचे/
जन कल्याणाचे/ काम करी//(२)
डोळ्यांत करुणा/ भावनाप्रधान
नैवेद्यासी मान/नाम्याचिया//(३)
चोखोबांची गुरे/जनीचे दळण
शेताचे रक्षण/ दामाजीच्या//(4)
ज्ञानेश्वरी, गाथा/ ग्रंथांचे लेखन/
देई स्फूर्तीदान/ कृपादृष्टी//(५)
वैद्य नि पोलिस/ हो परिचारिका
झाडू घेई हातां/ संकटात//(६)
भावाचा भुकेला/ भक्तीची तहान/
विठ्ठल महान/ शब्दातीत//(७)