माहेर
माहेर

1 min

207
माझा माहेराचा लळा
येई प्रेमाचा उमाळा!
आई माझी हरिद्वार,
बाबा माझे काशी क्षेत्र!
तीन बहिणी माझ्या असती,
जशा गंगा-यमुना-सरस्वती!
तिन्ही नदीचा संगम
होई प्रयागराज क्षेत्री!
भाऊ माझा कणखर,
जसे हिमालयाचे शिखर!
त्याची महती काय सांगू,
राखे भारताची शान!
माझे माहेर परळी क्षेत्र
त्याचे पुण्य न अन्यत्र!
तेच माझे काशीक्षेत्र,
तेच माझे हरिद्वार!