STORYMIRROR

Pandit Warade

Classics

4  

Pandit Warade

Classics

कधी कळणार तुला

कधी कळणार तुला

1 min
282

कधी कळणार तुला

माय बापाची महती

पाणी रक्ताचं करून

घास  तुला भरवती


कधी कळणार तुला

तुझ्या आईचं हृदय

दूर कामासाठी गेली

तिथं काढी तुझी सय


कधी कळणार तुला

एका क्षणाची किंमत

निसटला क्षण  पुन्हा

आणण्याची ना हिंमत


कधी  कळणार तुला

सैनिकांचे  उपकार

त्यांच्या जीवावर तुला

घरी झोप लागे गार


कधी कळणार तुला

घास कोण पचवतो

शांत झोपवितो तुला

कोण  रोज उठवतो


कधी कळणार तुला

तुझ्यातील प्रेमगंगा

अतरंगी  डोकावून

आळवावे पांडुरंगा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics