Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Wagle

Classics

4  

Shobha Wagle

Classics

संत वाणी

संत वाणी

1 min
271


ज्ञानाचे अमृत । पाजिले संतानी ।

घेतले लोकांनी । उपदेश ।।१ ।।


ज्ञान उपदेश । अज्ञानी लोकांस ।

सकल जनास । कल्याणास ।। २ ।।


ज्ञानोबा तुकोबा । वाङ्मय महान ।

करण्या सुजाण । लोक हिता ।।३ ।।


भुतदया दावी । संत एकनाथ ।

एकता मनात । बाप श्राध्दा ।। ४ ।।


सावंता माळीने । पाहिला मळ्यात ।

बागेच्या रुपात ।विठ्ठलाला ।। ५ ।।


बहिणा बाईच्या । ओव्याने शिकलो ।

श्रेष्ठत्व जाणलो । सामान्य स्त्री ।। ६ ।।


संतांची ती वाणी । ज्ञानाचे भांडार ।

शिक्षण साकार । संस्कृतीचे ।। ७ ।।


संतांच्या कार्याची । महती जाणावी ।

जतन करावी । आत्मसात ।।८ ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics