STORYMIRROR

angad darade

Classics

4  

angad darade

Classics

पंढरपूर

पंढरपूर

1 min
258

चला जाऊ आज l पंढरपूराला l

जाऊ दर्शनाला l माऊलीच्या ll


पांडुरंग माझा l आहे पंढरीशी l

चला रे तयाशी l भेटायाला ll


वारी घडो माझी l नित्य नियमाने l

तयाच्या कृपेने l जाऊ चला ll


जाऊ पंढरीशी l देवाशी भेटाया l

पडू त्याच्या पाया l सदा सदा ll


देव उभा आहे l सदा भक्तांसाठी l

जाऊ तया भेटी l आज चला ll 


एकादशी आज l पवित्र हा दिन l

होते दर्शनाने l सुखी मन ll


देव माझा थोर l आहे पांडुरंग l

जीव झाला दंग l भक्तीरंगी ll


अंगद हा गातो l तुझं गुण गाण l

देव तू महान l पांडुरंगा ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics