STORYMIRROR

Varsha Fatakale warade

Classics

4  

Varsha Fatakale warade

Classics

आम्ही वारकरी

आम्ही वारकरी

1 min
267

घेऊनी हरीनाम मुखी 

चालतो पंढरीची वारी

विठ्ठल येतो साथीला 

कष्ट मिटवितो सारी


चंद्रभागे तिरी कर कटावरी

घातले जरतारी पिवळे पितांबर

दिसे सुंदर रूप, विठ्ठल नामाच्या

जयघोषाने दुमदुमले हे अंबर


वारीमध्ये भक्तांचा

फुगड्यांचा चाले खेळ

ब्रह्मानंदी टाळीचा

घातला सुरेख मेळ


दर्शन घेता विठ्ठलाचे

डोळे भरूनिया येती

नित्यनेमाने माय लेकरू

ते भक्ती रसात न्हाती


शोभे डोईवरी छान

स्त्रियांच्या तुळशी वृंदावन

पाहूनिया भक्तांचा सोहळा

सर्वांचे भरून येई मन


दुःख चिंता मिटतील दर्शनाने

मनी लाभेल समाधान

आषाढी कार्तिकी एकादशीला

वारीत आनंदाला येते उधाण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics