STORYMIRROR

Pranoti Markande

Classics

3  

Pranoti Markande

Classics

डोकवावे अंतर्मनात कधी...

डोकवावे अंतर्मनात कधी...

1 min
168

खोटं बोलतो, वागतो मनुष्य साऱ्या जगाशी,

पण कसं खोटं वागशील रे मानवा स्वतःच्या मनाशी?


कलयुग आहे हे इथे नाही कोणताच मानव सच्चा,

चेहराच सांगतो सगळं काही नाही कोणी खिलाडी कच्चा.


सारे काही घडून जाते वाईट अथवा चांगलं,

पण मनी राहते सल त्याची केलं का आपण भलं?


म्हणूनच अंतर्मनात एकदातरी पहावे डोकावून,

पाप - पुण्याचा हिशोब करावा आठवून.


लक्षात येताच पापाची मोजणी,

सुधारावी या पुढची आपली करणी.


जे घडले ते नाही बदलता येणार,

पण पुढची वागणूक आपले भविष्य घडवणार.


सल अंतर्मनाची नाही जगू देत मनुष्याला सुखाने,

म्हणूनच अंतर्मनात डोकावून घ्यावे कर्तृत्वाचे आढावे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics