मानवता
मानवता
मानव, मानव, मानव दिसे चोहीकडे,
गजबजलेल्या शहरात मानवता हरवली कोणीकडे?
परिभाषा तरी असे मानवतेची काय?
सांगेल का मज कोणी मानवता हरवायला तिला असतात का हो पाय?
मानवता म्हणजे माणसाने माणसाशी माणूस म्हणून वागणे,
मदत, दया, प्रेम, जिव्हाळा या भावना व्यक्त करणे
नसे जिथे चढाओढ दुसऱ्याला खाली पाडण्याची,
मानवता म्हणजे तुझ्या यशात माझे यश समजण्याची
मानवता म्हणजे खरा धर्म,
मानवता म्हणजे फळाची अपेक्षा न करता केलेले निःस्वार्थ कर्म
मानवता म्हणजे नाही कोणाची हार जित,
मानवता म्हणजे खरेपणा आणि चांगुलपणाची रीत
मानवता म्हणजे नसे नुसते मानवी तन,
मानवी शरीराला हवे मानवतेचे धन
मानवता म्हणजे नाही नुसता मनुष्य जन्म,
मानवता म्हणजे मानवता धर्म जपा तुम्ही आजन्म
मानवता म्हणजे नाही ओ द्वेष आणि मत्सर,
मानवता म्हणजे प्रेम आणि मायेची कलाकुसर
अशी ही मानवता मिळेल कुठे सांगाल का मज कोणी या जगी?
अरे तुझ्यातच लपलेल्या मानवाला जागे कर म्हणजे मानवता सापडेल जागोजागी
