STORYMIRROR

Pranoti Markande

Inspirational

3  

Pranoti Markande

Inspirational

तेजविल्या ज्ञानज्योती

तेजविल्या ज्ञानज्योती

1 min
216

आज एकविसाव्या शतकात पदार्पण करताना एक प्रकर्षाने जाणवते,

कुठेतरी, काहीतरी हातातून निसटते.

पण काय नेमके ते उमजत नाही,

आणि ते शोधायला मन सारखे इकडे तिकडे पाही.


मग वाटे अंधार पडलाय प्रत्येक वाटेवर,

एवढं सारं चांगलं असताना मन का नाही थाऱ्यावर.

नेमका हा अंधार आहे तरी कशाचा?

निरक्षरता, अज्ञान, बंडखोरी आणि निराशेचा.


लाच घेऊन कामे होतात इथे सगळीकडे,

प्रामाणिकपणाची ज्ञानज्योत लावेल का कोणी तिकडे?

अज्ञान आणि निराक्षरतेने केला आहे कहर,

ज्ञान आणि साक्षरतेची ज्योत लावेल का कोणी कणभर?


खोटेपणा आणि चोरीचकारीची चढली आहे नशा,

खरेपणाची आणि चांगुलपणाची ज्योत लावेल का कोणी जागी अशा?

खून, मारामारी, बलात्कार याची आहे धुंदी या तारूण्यावर,

या बेधुंदपणाची चढलेली अंधळी पट्टी काढून सामंजस्याची ज्योत तेवेल का यांच्या डोळ्यावर?


अशी अनेक उदाहरणे,प्रसंग, आणि प्रश्न उभे आहेत आज युवा पिढी समोर,

पण सौम्य ज्योत नाही तर लावावी लागणार आहे तेज ज्ञानाची ज्योत कठोर.

या साऱ्यातून जेव्हा भारत देशाचा कण अन् कण होईल मुक्त,

तेव्हाच समजल्या जातील तेजविल्या ज्ञानाच्या खऱ्या ज्योती होऊन सारे संयुक्त.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational