आत्मपरीक्षण करा...
आत्मपरीक्षण करा...
दारू, गुत्ता, जुगार, अड्डा असे व्यसन,
कोण देईल या तरुण पिढीला सन्मानाचे आसन?
वाहवत चालली तरुण पिढी आजची या व्यसनाच्या अंधाऱ्या जगात,
घसरत चालली ती संस्कारांच्या अभ्यासात.
वेळ नाही, काळ नाही, नाही कशाचे भान,
चांगली समज द्यायला आता आमच्यात उरले नाही त्राण.
कळतं सारं पण वळत नाही अशी आहे परिस्थिती,
कोण बदलेल रे तुमची झालेली ही अशी स्थिती?
अवलोकन करा स्वतःचे कुठे हरवली तुमची बुद्धी,
चुका सुधारून करा तन आणि मनाची शुद्धी.
वेळ नाही लागणार या अंधाऱ्या दुनियेत नाश व्हायला,
मग कोणी येणार नाही ओ तुम्हाला सावरायला.
चला उघडा डोळे, करा आत्मपरीक्षण स्वतःचे,
काय मिळवले आणि काय गमावले द्वार उघडतील सत्याचे.
हाती काही उरले नसले तरी वेळ गेलेली नसेल,
नव्याने करा सुरुवात जीवन सार्थकी लागेल.
