STORYMIRROR

Pranoti Markande

Inspirational

3  

Pranoti Markande

Inspirational

आणि राम अवतरले...

आणि राम अवतरले...

1 min
206

अयोध्या नगरीत आहे दशरथाचे राज्य,

तीन राण्या दशरथ राजाच्या गुणवान आणि रुपसुंदर.

प्रजा आहे सुखी आणि विस्तारित आहे साम्राज्य,

राज्यात आहेत लढवय्ये एक से एक धुरंधर.


सल एकच टोचे दशरथाला मनात,

वंश पुढे चालवायला नाही संतती सुख अद्याप.

विचारा अंती आले ऋष्यशृंग ऋषींचे नाव ध्यानात,

अश्वमेध यज्ञ आणि पुत्रकामेष्टि याग केला श्रद्धेने अमाप.


पुत्रकामेष्टियाग चालू असताना अग्नीतून अवतरले एक महापुरुष,

संतान देणारे देवनिर्मित पायस दशरथास दिले त्यांनी देऊनी आशिष. 

हे पायस दशरथाने प्रियपत्नींना वाटून दिले सदृश,

गरोदर राहिल्या राण्या; आनंदाने झुकले देवासमोर साऱ्यांचे शिष.


रामाच्या जन्मा संबंधित झाली होती एक भविष्यवाणी,

मध्यान्हापुर्वी जन्म झाला तर मिळेल राजपाट आणि वैभव अपार;

पण मध्यान्हानंतर जन्म झाला तर भोगावा लागेल वनवास दीनवाणी.

ऐकून ऐसी भविष्यवाणी विचलित झाले अयोध्यावासी फार.


समय जवळ येताच मध्यान्हाचा कळा सुरू झाल्या कौसल्येला,

मनी प्रार्थना करी जन्मा येऊ दे रामाला मध्यान्हापूर्वी.

पण राम ही होते देवरुपी; ना आधी, ना नंतर आले बरोबर मध्यान्हाला,

आणि अशा तऱ्हेने राम अवतरले पृथ्वीवर नशीब घेऊन मिश्र देवांकरवी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational