STORYMIRROR

Pranoti Markande

Inspirational

3  

Pranoti Markande

Inspirational

जीवन म्हणजे एक संघर्ष

जीवन म्हणजे एक संघर्ष

1 min
317

जीवन म्हणजे असे एक संघर्ष,

इथे पावलोपावली देतो माणूस परीक्षा सहर्ष.

बालपण जाते मजेत वाटे असे साऱ्यांना,

बोबड्या बोलांनी भावना पोहोचवतांना संघर्ष करावा लागतो तान्ह्यांना.


नंतर पदार्पण होते तारुण्यात वाटे मजाच मजा,

अभ्यास,परीक्षा,शाळा,पुस्तके यांच्या संघर्षात वाटे ती सजा.

साऱ्यांचा मेळ जुळवत किती करावा लागतो तो संघर्ष,

आणि शेवटी काय तर कधी दुःख तर कधी सुख देऊन जातो तो परामर्श.


पुढची पायरी म्हणजे संघर्ष मिळवलेल्या ज्ञानाचा वापर अर्थप्राप्ती साठी,

सारे सोडून जातात तेव्हा कोणीच राहत नाही पाठी.

एकट्यानेच करावा लागतो संघर्ष मिळावया चांगली नोकरी,

तूच शोध, तूच कष्ट कर कोणी नाही तुझा वारकरी.


मग येतो संसार इथे ही नाही टळत हो संघर्ष,

कधी प्रेम तर कधी वाद होतो कर्कश.

नवरा, बायको, मुले यांचा बसवता मेळ,

जीवनाचाच होऊन जातो सारा खेळ.


वृद्धापकाळात पदार्पण केल्यावर ही अटळ आहे संघर्ष,

कधी मुलं विचारत नाहीत तर कधी एकटेपणाचा होतो स्पर्श.

आधाराची काठी हरवते कधी तर जोडीदाराची साथ सुटते कधी,

जीवनाची एवढी वर्ष कशी काढलीत वाटे मनी अपराधी.


असा आहे जीवन म्हणजे एक संघर्ष,

जो शेवट पर्यंत टिकतो तो होतो विजयिदृष्य.

ज्याला कळला नाही जीवनाचा खरा अर्थ,

त्याला मिळत नाही परमार्थ.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational