आम्ही सावित्रीच्या लेकी
आम्ही सावित्रीच्या लेकी
घराच्या चार भिंतींपलीकडे ही एक जग असते,
त्यात स्वतःची जागा बनव आणि शोध स्वतःचे रस्ते.
सावित्रीबाई देऊन गेल्या हा मंत्र स्त्री जातीला,
आणि बदलून गेली स्त्रीच्या जीवनाची परिभाषा या समयाला.
सावित्रीच्या लेकी म्हणून ओळखल्या जाऊ लागलो आम्ही,
क्षेत्र कोणतं ही असो नाही आमच्यात कमी.
डोक्यावर पदर ते जीन्स पँट हा प्रवास नव्हता सहज,
चूल आणि मूल ते नोकरी व्यवसाय या वाटेवर पडली अफाट धैर्याची गरज.
आधी ही कर्तृत्व सिद्ध करत होतो चार भिंती आड,
एकत्र कुटुंबात स्वतःला झोकून द्यायला लागते मोठी धाड.
नऊवारी साडी मग सहावारी साडी अशी चढलो मजल दर मजल,
आज स्त्री स्वतंत्र आहे पाहून सावित्रीबाईंच्या मनातली मिटली असेल सल.
स्त्री पुरुष समानता हे नुसते घोषणा पुरता नव्हे,
तर अमलात आणायला हवे.
आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर,
पाहून हे मिटले पारणे डोळ्यांचे विजय मिळवला स्वतःवर.
हे सुदिन पहावया मिळाले ते फक्त सावित्रीबाईंमुळे,
नाहीतर रांधा रगाड्यात आम्ही स्त्रिया ठरलो असतो खुळे.
शत शत प्रणाम त्या विरांगणाला,
गर्वाने सांगतो *आम्ही सावित्रीच्या लेकी* या जगाला.
