STORYMIRROR

Pranoti Markande

Others

3  

Pranoti Markande

Others

राम राज्य येऊ दे

राम राज्य येऊ दे

1 min
166

रामनवमीचा दिवस आज खास,

मनात सुरू झाली विचारांची आरास.

न जाणो कुठे गेले ते सुदिन? 

मिळेल का पुन्हा व्हायला आनंदी क्षणात लीन?


सगळीकडे लुटमार, भ्रष्टाचार आणि चोरीमारी,

कुठून आली ही बुद्धी व्यभिचारी?

कोणी हिरावले राम राज्य सुखाचे?

का आले हे दिन दुःखाचे?


होऊ दे सगळीकडे प्रामाणिकतेची बरसात,

सगळ्यांना चालू दे हातात घेऊनी हात.

एकता आणि निष्ठेची तेवू दे वात,

मिटून जाऊ दे ही अज्ञानाची रात.


राम राज्य म्हणजे नक्की काय रे राया?

तर सत्य, एकवचन आणि निष्ठेचा घट्ट पाया.

भारतात आहे आज याच गुणांची कमी,

म्हणून हवी आहे पुनश्च राम राज्याची हमी.


Rate this content
Log in