कोकण - एक स्वर्ग
कोकण - एक स्वर्ग


सुख, समृद्धीने, अन् विविधतेने, नटलेला जणू एक स्वर्ग
देवानेही तन्मय होऊन, बनविला असेल हा रम्य निसर्ग
राने, वने,पशु,पक्षी,पाखरे, मिळूनही बनले आहे हे सर्व
सारे काही समावलेला,जणू 'माझा कोकण' हा एक स्वर्ग
माणसांमधील भाषेतील गोडी,आपुलकी अन माणूसकी
इथल्या मातीनेच घडवली,प्रेम अन जिव्हाळयाची नाती
भरून येई मनी शांतता,घेता मोकळा श्वास सागरकिनारी
सुंदरता या माझ्या कोकणची, गगनातही न सामावणारी!
जन्म मिळाला या मातीत, याहून नसेल काहीच मोठेपण
वादविवाद विसरुनी राहती,माझे कोकणकरी हे सर्वजण
परंपरा, मायबोली अन् संस्कृती, साजरे करीता सारे सण
ओंकार तुलना करी म्हणवुनी 'स्वर्गाहूनही सुंदर कोकण'!