परिचारिका (NURSE)
परिचारिका (NURSE)
1 min
3.8K
रुग्णसेवेचा भार खांद्यावर ठेवून चालते ती एक सिस्टर,
तसे तर तिच्या घरीही असतात आई बाबा मुले व मिस्टर!
वर्चस्व, सत्ता, अधिकारी काहीच माहित नसते तिला,
समाधानी असते ती कारण रुग्णसेवेचा मान मिळाला!
करते ती रुग्णसेवा प्रतिन्येची न्यानज्योत तेवत ठेऊन,
त्यामुळे रुग्ण ही बरा होतो प्रकाशमान आरोग्य घेऊन !
करते काम ती निःस्वार्थ निष्काम परोपकारी मन ठेऊन,
आस एकच असते रुग्ण बरा व्हावा योग्य उपचार घेऊन !
निःस्वार्थ निष्काम परोपकारी बनून ती रुग्णसेवा करते,
तरीही जग सारे नेहमी तिच्याचकडे बोट का दाखवते?
जीवही पणाला लावून काम करते सदैव मौन ठेऊन,
या जागी मान तरी राखा तिचा योग्य आदर देऊन !