Omkar Satardekar

Tragedy

4.6  

Omkar Satardekar

Tragedy

आत्महत्या

आत्महत्या

1 min
455


काय करावे शब्दच जुळुनी येता, असते त्यातही सत्यता,

बनते एक अशी ही कविता, नाव आहे तिचे आत्महत्या !

बोल जे सारे लिहिले गेले, रचून ठेविले नव्हते,

कागदावरील बोल हे सार, पेनचं सांगणार होते !


जन्म देताना तुझ्या आईला, झाला होता खुपच त्रास,

याचीही तू जाण न ठेवता, का करतो मृत्यूचा प्रयास? 

एक वेळ मन स्थिर करोनी, तुझाच थोडा कर विचार, 

आई, बाप जगाने तुझ्यावर, केले आहेत खूप उपकार ..!


खाण्या -पिण्या दिले शरीरही, मनात दिले सुंदर विचार, 

तरीही वेड्या ! कसा येतो, मनात तूझ्या आत्महत्येचा विचार? 

येताना तू एकटा आला होता, जातानाही जाणार एकटा,

मग जगाचे व्यर्थ बोल मनी लावुनी, का करशी आमहत्या? 


Rate this content
Log in