STORYMIRROR

Vanita Bhogil

Classics

3  

Vanita Bhogil

Classics

वसंतकिरणे

वसंतकिरणे

1 min
194

उपकार किती तुझे कसे सांगू ना,

जाहली पवित्र धरणी तुझ्यामुळे नारायणा..  


पोषणकर्ता तुचि आमुचा, तुझ्याविना ब्रम्हांड सुने ना,

जाहली पवित्र धरणी तुझ्यामुळे नारायणा..


उमलती फुले तुझ्या येण्याने, गाईस फुटतो रे पान्हा,

जाहली पवित्र धरणी तुझ्यामुळे नारायणा..  

 

जाग येते कोकिळा गाते तुझ्या येण्याने, तू ही कधी थोडासा विसावना,

जाहली पवित्र धरणी तुझ्यामुळे नारायणा..


तुझ्या स्पर्शाने कणाकणात प्राण येई, वसंती बहार मनास स्पर्शूनी जाई,

तू इतका उदार कसा सांगना, जाहली पवित्र धरणी तुझ्यामुळे नारायणा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics