Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vanita Bhogil

Others

3  

Vanita Bhogil

Others

क्षणभंगुर

क्षणभंगुर

1 min
237


स्वप्नात पाहिले मी, चांदणे ओंजळीत भरले, जाग आली तेव्हा तळवे रितेच राहिले...

----

 स्वप्नात पाहिले मी,

बिलगला तो मजला,

जाग आली तेव्हा वारा निघून गेले...

----

स्वप्नात पाहिले मी,स्पर्श होता गाली, जाग आली तेव्हा मृगजळ नष्ट झाले...

----

स्वप्नात पाहिले मी,

हात हाती होता,जाग आली तेव्हा पुसल्या अनेक रेखा...

----

स्वप्नात पाहिले मी,सोबत तुझीच सखया, जाग आली तेव्हा,ओसाड होती दुनिया...

----

स्वप्नात पाहिले मी,

मला पंख आशेचे,जाग आली तेव्हा,तुरुंग यौवणाचा...

----

स्वप्नात पाहिले मी,

स्पर्श हा हवासा,जाग आली तेव्हा, ठाव नव्हता मनाचा...

----

स्वप्नात पाहिले मी,

डोळे भरून तुजला,

जाग आली तेव्हा नयनी अश्रू होते...

----

स्वप्नात पाहिले मी,रंगीत जग हे सारे,जाग आली तेव्हा विरून काळे झाले...

----

स्वप्नात पाहिले मी,स्वर्ग सुख जवळी,जाग आली तेव्हा वेळ निघून गेली...

----

स्वप्नात पाहिले मी,आयुष्याची रंगत न्यारी,जाग आली तेव्हा,सैरभैर सारे...

----

स्वप्नात पाहिले मी , सजवून राजवाडे,

जाग आली तेव्हा,शेवटचे नगाडे...

----

स्वप्नात पाहिले मी, रान हिरवळीचे, जाग आली तेव्हा, धगीचे वणवे होते...

----

स्वप्नात पाहिले मी, जवळी ध्रुव तारे, सखया जाग आली तेव्हा, होते भोवती निखारे...होते भोवती निखारे....


Rate this content
Log in