Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vanita Bhogil

Others

3  

Vanita Bhogil

Others

आई

आई

1 min
218


आई तुझ्या आशीर्वादाची सर नाही कुणा...

सृष्टीचा प्रत्येक जीव तुझ्या मायेविना उणा...

      तुझ्या काकणाची किणकिण देते मायेचा आधार...

जन्मोजन्मी नाही फिटायचे माय तुझे उपकार...

     सगळ्या सुखाची ग ऊब...

तुझ्या फाटक्या वाकळीत....

    साऱ्या जन्माची झोप माय तुझ्या ग कुशीत.....

    

     आई तुझ्या ग वीणा सारा त्रिखंड ग सुना...

   आईची माया मिळावी म्हणून जन्म घेई पुन्हापुन्हा....


तुझ्या हातच ग पिठल जणू पाच पक्वान्नच ताट..

 तुझ्या आठवणीत काळीज ग झालं घनदाट..


   माहेरची वाट आज झाली ग सुनी...

 लेक येईल म्हणून वाट बघणा ग कुणी...

  

 आई एकच मागण तुझ्याकड..

 पुन्हा जन्म घेउदे तुझ्या कुशी...

  देव म्या नाही पहिला,कोटी देव दिसले मला फक्त तुझ्या ग पायापाशी....


  कधी नाही फिटायचे उपकार तुझे..

  माय तुझ्या आशीर्वादान धन्य झाले जीवन माझे...


  तुझ्या सावलीत कमी आभाळ बी पड,

तुझ्या मायेविना त्रिभुवनाचा स्वामी बी रड...


Rate this content
Log in