STORYMIRROR

Vanita Bhogil

Others

3  

Vanita Bhogil

Others

वादळ

वादळ

1 min
212

माफ कर कोरोना...

आता सहन काही होईना...


खूप निघाले सोबत तुझ्या,

 पण तुझं मन काही भरेना....


देवळे झाली बंद ,सोसेना रे भार

सगे सोयरे नातलग मिळेनात खांदेकरी चार..


ठप्प झाले सरकार,

कोलमडले सारे परिवार, 

हात जोडते तुला बस कर तुझा पाहुणचार .....


म्हणे पाप वाढले खूप म्हणून तू आलास...

पाहुणा म्हणून आलास आणि रहिवासी झालास?

   

पण एक सांगते कोरोना असशील तू कुण्या गावाचा....

  आमच्या भारत भूमीत तुझा पाहुणचार नाही व्हायचा...


वादळासारखा तू आलास,गोरगरिबांचे संसार विस्कटून ठाण मांडून बसलास..

 

आलास तसा परत जा, खुप लावलेस दिवे.....

  तुझ्यासारखी संकटे आम्हास नाहीत नवे..

  

नाहीत भीत आम्ही तुझ्यासारख्या किटकाला..

 आम्हीही सुट्टी दिली रे थोडे दिवस कामाला.....


पण तुला आता संपवणार, जिद्द आहे आमची,,,

स्वतःला घरात ठेऊन, तुझी पाठवणी करू कायमची.....


Rate this content
Log in