STORYMIRROR

Vanita Bhogil

Others

3  

Vanita Bhogil

Others

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
257

ओल्या सरी सळसळती, दव साचले टपोरे..

हिऱ्यापरी लखलखती पाते, मन आनंदले सारे..


निळ्या आभाळी छटा ,जणू मोरपंख फुलला..

इंद्रधनू बहरता, निसर्गराजा ही भुलला..


कळी खुलली फुलांची, सुगंध मातीचा दरवळला..

माळूनी रंगबिरंगी गजरे,श्रावण ही शहारला..


कौतुके बागडती फुलपाखरे,त्यांचा तालच वेगळा..

पहिल्या थेंबांच्या स्पर्शाने ,चातक ही तृप्त झाला..


कवी मन झाले ओले पावसाळी सोहळा,

पांघरून चादर फुलांची,ऋतू झाला गारवा हिरवा..


गाती कोकीळ ,पारवा मातीचा सुगंध हवा हवा..

मन प्रफुल्लित होई उडे पाखरांचा थवा..


गाती कवी मन आनंदे, संगीत देती सरी,

ताल धरला मातीने, नद्या झरे नृत्य करी......


Rate this content
Log in