*हिरवे हिरवे रान*
*हिरवे हिरवे रान*
कसे माळरान हे फुलले,
दिसे रान हिरवे हिरवे
भान वाऱ्याचे हरपले,
रूप धरतीचे खुलले ||धृ||
घेऊनि आलं रान,
कस हिरवं हिरवं उधाण
सप्तरंगांची उधळण,
करी इंद्रधनूची कमान
ढग ढोल वाजवून,
जागं करी सारं रान
बहरे एकेक झाड,
अन फूल, फळ ,पान
पावसाच्या सरींनी
ओलंचिंब रान झाले ||१||
सावळ्या मेघांनी
केला वर्षाव पावसाचा
धुंद रानालाही होई ,
आता मोह फुलण्याचा
ऊन पावसाचा खेळ,
करी बावरा रानाला
साद देई सारं रान,
त्या उधाण वाऱ्याला
त्याच्या आवाजाला
फुले पाने सारे आसुसले ||२||
फुटुनी पालवी,
झाडवेली फुलली
जणू जाळीदार हिरवी नक्षी,
रानात सजली
दिसे साऱ्या रानभर,
पक्षी फांदीफांदीवर
कोकिळेचं गान रानी,
ऐकू येई झाडावर
थयथय मोर नाचे,
फुलपाखरे भिरभिरे ||३||