मृदूंग पाऊस सरी
मृदूंग पाऊस सरी
1 min
209
मृदूंग पाऊस सरी
मन माझं वेड करी
थेंब मोतियाचा परी
झेलिते ओंजळीवरी...
चिंब चिंब पावसात
भिजे पाखरे रानात
ढग ढोल वाजवत
नक्षी विजांची नभात...
हिरवा शालू लेऊन
दिसे धरती खुलून
झाडवेली बहरून
खुले फुल कळी पान...
गंध हा ओल्या मातीचा
फुले पिसारा मनाचा
वारा बेभान जोराचा
देई गारवा सुखाचा...
मयूर पंख फुलत
नाचतो मोर रानात
सप्तरंग उधळीत
इंद्रधनु चमकत...
नभ पांघरुनी मन
जाई शिंपित चांदणं
आषाढसरी झेलून
हसे उगी शहारून...
भिजत हिरवं रान
ओलं चिंब होई मन
या थेंबांत विसावून
जा जगास विसरून...