STORYMIRROR

shobha jadhav

Others

3  

shobha jadhav

Others

*सण दिवाळीचा

*सण दिवाळीचा

1 min
439

सण दिवाळीचा आला 

घेऊनी आनंद नवा

चैतन्य नांदते घरात 

नाते प्रेमाने फूलत

 

फटाक्यांची आतषबाजी 

उधळत रंगाची न्यारी 

गाजत येते दिवाळी 

सुबक घरापुढे रांगोळी 


नवे पोशाख घालून 

मिरवती सारेजण 

अंगावर अलंकार 

शोभती सुंदर 


गोड फराळ भरपूर 

गंध सारीकडे दरवळ 

उत्सव साजरा करण्या 

आनंद ओसंडतो पार 


धुंदीत गाती नाचती 

सारेजण सुखाने जगती 

आकाशदिवे रंगीत 

घरापुढे सजती सुंदर 


सायंकाळी दिव्यांची आरास

उत्सव घराघरात अन लक्ष्मी चा वास

उजळूया आता दीप मनाचे

घेऊया वेध प्रगती पथाचे


निमित्त सणासुदीचे 

गाठीभेटी घेण्याचे 

नात्यातले नाते फुलण्याचे 

असे महत्व दिवाळीचे


Rate this content
Log in