STORYMIRROR

shobha jadhav

Others

3  

shobha jadhav

Others

शब्द मोतियाचे धन

शब्द मोतियाचे धन

1 min
251

शब्द मोतियाचे धन ,

जसे मनात चांदणं ,

शब्द ओठी रेंगाळता ,

येती ओथंबून घन...


शब्द दिसे झाडामधी ,

कधी फुले फांदीवर ,

कळीतून उमलता ,

गंध जातो दूरवर...


शब्दफुले फुलतात ,

मनाच्या हिरवळीत ,

रेशीम मखमलीत ,

शब्द दरवळतात ...


जशा चांदण्या नभात ,

शब्द नाचती मनात ,

सूर्य प्रखर तेजात ,

शब्द प्रकाश देतात....


सुख दु:खात सोबत ,

साथ देई जीवनात ,

कधी रौद्र , कधी शांत ,

जीव रमतो शब्दांत....


Rate this content
Log in