या सांजवेळी
या सांजवेळी
सांज वेळी तुझी
वाट मी पाहतो
अधीर झाले मन
तुला मी शोधतो
तुझ्या सवे मी सखे
माळरानावरी रचिले
किती आशेचे उंच मनोरे
सुंदर स्वप्न मनी पहिले
सांजवेळी सूर्यास्त
अनेकदा आपण पहिला
आपल्या अनेक वचनांचा
साक्षीदार तो राहिला
रंगा रंगाच्या विविध
छटा, गडे पडती किती
तुझ्या गालावरी,पाहण्यास
किरणे सारी आतुरती
सांजवेळी खग सारे
विहरती, आपल्या घरी
सारे परतती, काळोखाचे
राज्य हळू हळू पसरे भूवरी