Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bharati Sawant

Classics

3  

Bharati Sawant

Classics

हे बंध रेशमाचे

हे बंध रेशमाचे

1 min
435


तव भेटीसाठी उतावीळ मी, मन काहूरते

ये भेटाया झडकरी मजला सख्या मी झुरते ||धृ||


हृदयातील स्पंदनांनी पेटवल्या तप्त ज्वाला

सख्या तुजला येण्यास इतका उशीर का झाला

धकधक करूनी काळीज माझे हुरहूरते

ये भेटाया झडकरी मजला सख्या मी झुरते ||१||


हे बंध रेशमाचे जोडलेत प्रेमाचेच धागे

कशी सांगू प्रियतमा तुला रहा उभा तू मागे

डोळ्याची पापणी तुझ्या भेटीस्तव फरफरते

ये भेटाया झडकरी मजला सख्या मी झुरते ||२||


पौर्णिमेच्या चांदण्यांचा पडला शुभ्र हा प्रकाश

त्रस्त तारे नक्षत्रेही काळवंडलेय आकाश

गुंफलेय सप्तपदींनी तुजसवे आज नाते

ये भेटाया झडकरी मजला सख्या मी झुरते ||३||


डोळ्यांची ही दोन पाखरे विसावू दे खांद्यावर

नको सोडू साथ ही प्रेमाची हात हातात धर 

सांगता गूज प्रीतीचे कानी कायाही थरथरते

ये भेटाया झडकरी मजला सख्या मी झुरते ||४||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics