शिकवण संस्कारांची
शिकवण संस्कारांची
वाटू ज्ञान लेकरांना
शिकवण संस्कारांची
पेरू ज्ञानगंगा येथे
विद्या सद् विचारांची
पिढी नव्या जमान्याची
तेच उद्याचे भविष्य
सृजनत्व देण्यासाठी
घडवूया हो आयुष्य
राखतील मान उद्या
पोहोचवू ज्ञानसिंधू
देशासाठी झटण्यास
वेचतील प्राणबिंदू
बोल शिकवू थोरांचे
नको मनी कूविचार
तेढ जातीपातींचीही
आठवूया सदाचार