STORYMIRROR

Sanjay Gurav

Classics

3  

Sanjay Gurav

Classics

जपून ठेव..

जपून ठेव..

1 min
255

जपून ठेव सारे

क्षणांचे रांजण

तेवत ठेव तव

नयनांचे निरांजन.


सांगावे नलगे तुला

तुझी जपणूक भारी

मी खुशालचेंडू आहे

तुजवर भिस्त सारी.


मी उधळावे आणि

तू कणकण वेचावे

अनमोल क्षण ते

कोंदणात साचावे.


उरलेल्या दिवसांची

सांग देता येते ग्वाही?

जपलेल्या क्षणांचे

मात्र तसे होत नाही.


मारु शिळोप्याच्या गप्पा

खुला करून मनकप्पा

जपून ठेव सारे अजून

गाठायचा आहे टप्पा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics