STORYMIRROR

Shobha Wagle

Classics

3  

Shobha Wagle

Classics

चंद्र आहे साक्षीला

चंद्र आहे साक्षीला

1 min
250


शामलाक्षरी काव्य लेखन


कर घेतला हाती

चंद्र आहे साक्षीला

कर वचन पुर्ती

तुझ्या माझ्या प्रितीला....१


भेट तुझी घडली

ही अचानक अशी

भेट वस्तू पाहुनी

कळी खुलली कशी....२


जीवन छान माझे

आहे सुखी संसार

जीवन हवे सर्वां

टाकू नको बेकार.....३


पण केला मी आता 

जपून वापरीन

पण व्यर्थ उगीच

वाया नाही घालीन.....४


भाव ठेवा श्रद्धेचा

विश्वास तो मायेचा

भाव वाढे वस्तुचा

प्रश्न पोट पुजेचा.....५


मान दे गरिबा

कर त्याला मदत

मान दुखते तर

योगा कर सतत.....६


शब्द एक अर्थ दोन

१) कर:- हस्त, करणे

२) भेट :-मिळणे, वस्तू (गीफ्ट)

३) जीवन:- जगणे, पाणी

४) पण:- करार, परंतू

५) भाव:-भक्ती, किंमत

६) मान:- समज, गर्दन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics