मराठी भाषेचा वारसा
मराठी भाषेचा वारसा


माय मराठी आम्हास सांगे
शतदा नव्याने प्रेम करावे
शब्दसंध्या मायबोली जणू
परतुनी पुन्हा तिला आठवावे
संत कवी सज्ञान असेही
मानव मराठी मर्द रांगडे
लेखणीतली पुण्याई ती
श्रीहरी चरणी घाले साकडे
रक्तरंजित मल्हार वदती
मायबोली अभिमानी डोले
मावळ्यांची ही पावन भूमी
शिवशाही मनगटी तोले
खुलता स्पंदने ही हृदयी
खंबीरतेचे दर्शन देती
सांगू काही भाषा माझी
मराठी मी भाषिक सांगती
वारसा तुझा जपतो आहे
पुन्हा पुन्हा सांगे नवलाई
माय मराठी भाषा नाही
लेकरांची तर असे ती आई