STORYMIRROR

Pallavi Bramhankar

Inspirational Others

3  

Pallavi Bramhankar

Inspirational Others

देव आहे देव असतो....

देव आहे देव असतो....

1 min
321

देव आहे देव असतो

ठाई ठाई तो दिसतो

चराचरात वसतो

देव आहे देव असतो


लेणं प्रेमाचं देतो

भावनेला रंगवतो

शब्दांची चाहूल देतो

देव आहे देव असतो


तो निराधार होतो

सर्वांस आधार देतो 

आपुलकीचा हात होतो 

देव आहे देव असतो


सत्य शिकवतो 

परिभाषा देतो 

सत्वर धावून येतो 

देव आहे देव असतो


तो अन्याय मोडतो 

न्याय देवून जातो 

तराजूत तोलतो 

देव आहे देव असतो


तो चिंता हरतो 

विघ्नहर्ता असे तो 

सुखकर्ता सिद्ध तो 

देव आहे देव असतो


तो परीक्षाही घेतो 

स्वभाव ओळखतो

प्रामाणिक भाव देतो

देव आहे देव असतो


तो सर्वकाही समजतो 

साटंलोटं ही पाहातो

परिस्थिती तो जाणतो 

देव आहे देव असतो


घडी आयुष्याची होतो 

वेळ गणिती मांडतो 

आधी- नंतर खेळतो

देव आहे देव असतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational