Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pallavi Bramhankar

Inspirational

3  

Pallavi Bramhankar

Inspirational

गुरु...

गुरु...

1 min
286

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु म्हणुनी करते सुरुवात

ज्ञानाच्या तेजोमय दिव्याची अखंड मग होते वात..||ध्रु||

गुरूंचा आदर्श हा सहवासात लाभतो

अज्ञानाच्या अंधारातूनी ज्ञानाकडे घेऊन जातो..||१||

अलंकाराहूनी तेज गुरुचे प्रज्वलित करूनी जाते

आज्ञेच्या त्या प्रसादाने मन तल्लीन मग होते..||२||

संस्काराची जडणघडण आयुष्यभर तो करतो

आदर्श म्हणूनी तो सतत तेवत राहतो..||३||

खंडन पडू देत नाही शिष्याच्या सुखाला

सोबत करितो त्याची जीवनातल्या दुःखाला..||४||

वंदन करुनी त्याला मीही मग नमतो 

प्रेमाची पांघरण अशी पदोपदी तो ठेवतो..||५||

Rate this content
Log in