तिरंगा
तिरंगा
1 min
53
त्रिरंगाचा हा तिरंगा
असे प्रतीक ऐक्याचे
आपुलकीने राहूया रे
सांगतो महत्व प्रेमाचे..१
बंधुभाव मनी ठेवुनि
एकता अन् धैर्याचे
हिंदुस्तानी या मातीच्या
उत्तुंग त्या कार्याचे..२
लाल होळी खेळणाऱ्या
त्या शहीद जवानांचे
मातृप्रेम राखूनी मनी
धगधगत्या या मातीचे..३
शौर्यगाथा गाजवणाऱ्या
भारतभूमीच्या पुत्रांचे
अभिमानाने गौरविलेल्या
त्या वीरांच्या क्रांतीचे..४
केशरी,पांढरा,हिरवा
नटलेल्या अपुल्या तिरंग्याचे
जवळूनी चला पाहूया
शौर्य या राष्ट्रध्वजाचे..५
सुजलाम-सुफलाम अश्या
अपुल्या पवित्र देशाचे
गीत गाऊ या पुन्हा
संविधानाच्या विधानाचे..६