मासिक पाळी
मासिक पाळी
1 min
526
मासिक पाळी म्हणजे एक शब्द
मुलीचा मुलीला कळलेला
अचानक येऊन पाहुणा
जणू तिलाच असतो वळलेला
मासिक पाळी म्हणजे एक प्रवाह
तिच्या जीवन घडीचा
फार मोठ्या नसून सुद्धा
जणू तिच्याच साठी असतो धडपडीचा
मासिक पाळी म्हणजे एक त्रास
तिला सोसावा लागणारा
पुन्हा पुन्हा येऊन देखील
जणू तिलाच प्रश्न करणारा
मासिक पाळी म्हणजे एक चाहूल
मुलीच्या जीवनात भिनभिनणारी
नकळतच येऊन कधी
जणू तिलाच गाऱ्हाणे सांगणारी
मासिक पाळी म्हणजे एक लहर
तिला कधी नको असणारी
जीवनात येऊन सुद्धा
जणू स्वतःचेच महत्व देणारी
