ऋतुगंध
ऋतुगंध
आसवांना साद येते
पुन्हा स्वच्छंद कल्पतरूची
कविमनाच्या आशयाला
चाहूल येते ऋतूगंधाची ||१||
हळूच बोलक्या कोकळीयेला
पहा अचानक पक्षीणियेची
मनात खुलत्या गोड कळीला
चाहूल येते ऋतूगंधाची ||२||
क्षणात हसणार क्षणात रूसता
खोडकर त्या मृदूगंधाची
लाजऱ्या साजूक मुखाला
चाहूल येते ऋतूगंधाची ||३||
हिरवा शालू पांघरलेल्या
मऊ उणाच्या रेशीमधाग्याची
श्रावणातल्या गोड सरीला
चाहूल येते ऋतूगंधाची ||४||