मी रक्षक भारतमातेचा
मी रक्षक भारतमातेचा
1 min
35
मी रक्षक भारतमातेचा
मी रक्षक भारतमातेचा
तिच्याच साठी झटणारा
एक वीर या मातीचा..१
शत्रूंपासूनी वाचविणारा
एक लढाऊ मी क्रांतीचा
शौर्य पराक्रमी गाजविणारा
मी रक्षक भारतमातेचा..२
संस्कृती जोपासणारा
वारसा मी हक्काचा
वीर पुत्र म्हणुनी जगणारा
मी रक्षक भारतमातेचा..३
सार्वभौमत्व स्वीकारणारा
बहुजन मी मुक्तीचा
स्वराज्यासाठी धगधगणारा
मी रक्षक भारतमातेचा..४
तिरंग्याची लाज राखणारा
असे रंग मी एकतेचा
बहुरंगांनी सामावणारा
मी रक्षक भारतमातेचा..५
उंच गगनी फडफडणारा
राष्ट्रध्वज मी शांतीचा
नतमस्तक नभी होणारा
मी रक्षक भारतमातेचा..६
