पाऊस...
पाऊस...

1 min

21
अचानक येतोस तू
काहीही न सांगता
पूर्ण करतोच इच्छा
काही न मागता..१
कधी बरसतो तू असा
जणू रागावलाच आहेस
मग नखरे करतोस
जसा तूच राजा आहेस..२
विजांनाही जणू तू
आमंत्रण देतोस
सोबत तुझ्या त्यांना
घेऊनच येतोस..३
चिंब चिंब भिजवून
तु थकत मात्र नाही
आगमनाने तुझ्या
आम्हाला मिळते ग्वाही..४
असं कसं येतोस
तू सांग ना जरा
हरवून मात्र आम्हाला
जातोसच खरा..५
सरीवर सरी तू
आणतोस ना रे राजा
भिजतांना मात्र
येते बरं का मज्जा..६
पुन्हा पुन्हा येऊन
देतोस तू उल्हास
येण्याआधी मात्र
लावतोस तू आस..७
नकळतच असं
येतात का रे पाऊसा
सांग ना आम्हालाही
तुझा खेळ हा कसा..८