STORYMIRROR

Pallavi Bramhankar

Others

3  

Pallavi Bramhankar

Others

मासिक पाळी

मासिक पाळी

1 min
774

मासिक पाळी म्हणजे एक शब्द

मुलीचा मुलीला कळलेला

अचानक येऊन पाहुणा 

जणू तिलाच असतो का वळलेला?

मासिक पाळी म्हणजे एक प्रवाह

मुलीच्या जीवन घडीचा

फार मोठा नसून सुद्धा

जणू तिच्याच साठी असतो धडपडीचा

 मासिक पाळी म्हणजे एक त्रास

तिला सोसावा लागणारा

पुन्हा पुन्हा येऊन देखील

तिलाच प्रश्न करणारा

मासिक पाळी म्हणजे एक चाहूल

मुलीच्या जीवनात भिनभिनणारी

नकळत येऊन कधी

तिलाच गाऱ्हाणे सांगणारी

मासिक पाळी म्हणजे एक लहर

तिला कधी नको असणारी

जीवनात येऊन सुद्धा

स्वतःचेच महत्व देणारी


Rate this content
Log in