आसमंत दाटलेला
आसमंत दाटलेला

1 min

281
आज खुळ्या मनाचा पक्षीही आहे हरपलेला
काजव्याचा धुंदवारा असाच आहे साठलेला
कोवळीच्या पाखराला नभही आहे भेटलेला
अंगणातला मृदुगंध जणू असाच आहे गाठलेला
ऋतूंचा या गर्दीतही एकाकी मग आहे पेललेला
सप्तसुरांच्या मेघात ही गंध सुरांचे आहे सोबतीला
रेशीमधाग्यांनी बांधलेला कौल आहे कवेतला
सागराच्या शिंपल्यातला मोती आहे विणलेला
शुभ्रातल्या चांदण्यांनी घन निळा आहे पांघरलेला
उत्तुंग गगनी जणू हा आहे आसमंत दाटलेला