स्नेहबंध
स्नेहबंध
काही नाती जन्माने मिळती
तर काही नाती नियती बनवती
नाती स्नेहाच्या धाग्याने गुंफती
गोड नाती निर्माण मग होती
जपलं तर नात टिकतं
ती मग फुलतात उमलतात
मायेचा वर्षाव करतात
आशेचे पंख त्यांना फुटतात
मनाच्या कोपऱ्यात असतं
मैत्री नावाचं नवं नातं
भावबंधनाने ते जोपासलं जातं
आपल्या मनावर ते राज्य करतं
जन्मांतरीच असतं नातं
ऋणानुबंध निर्मित नातं
स्नेहबंध हे जपत नातं
आठवणीत रमत नातं
अश्रूंना आवर घालतं नातं
मनाच्या भावना जपत नातं
उनाड मनाला आवरत नातं
सर्वांची काळजी घेत नातं
विश्वासावर चालत नातं
विश्वास निर्माण करतं नातं
विश्वासाने दृढ होत नातं
विश्वासाने जिकंल जातं नातं
