STORYMIRROR

Archana Rahurkar

Classics

3  

Archana Rahurkar

Classics

नखऱ्याच्या गौळणी

नखऱ्याच्या गौळणी

1 min
250

भरलाय बाजार मथुरेचा

माठ भरला मी दह्याचा

आल्या सोबतीला बाराजणी...

भलत्याच...

........नखऱ्याच्या गौळणीllधृll


आली गवळण नाव... सईबाई...

पुढे जाण्याची सदा... घाई...

तिला अाडवा गं जावा... कुणी...

भलत्याच...

.......नखऱ्याच्या गौळणीll१ll


आली गवळण नाव... सगुणाबाई...

तिला बोलण्याची रितच... नाही...

जावा शिकवा गं तिला... कुणी...

भलत्याच...

...........नखऱ्याच्या गौळणीll२ll


आली गवळण नाव... यमुनाबाई...

तिला माठच... उचलत नाही...

माठ उचलून द्यावा... कुणी...

भलत्याच...

..........नखऱ्याच्या गौळणीll३ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics